सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापुरात असणार वीस दिवस मुक्काम!

लोकसभा निवडणुकीचे वारे सगळीकडेच जोर धरत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे काल मंगळवारपासून वीस दिवस सोलापूर मुक्कामी आले आहेत. अजून भाजपचा उमेदवार हा निश्चित झालेला नाही मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात आलेले आहे. काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी ते मोर्चे बांधणी करणार आहेत.

ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे काल मंगळवारी सकाळी सोलापुरात आले. त्यांनी अनेक संघटनात्मक कामांचा आढावा घेतला. शिंदे यांनी मागील महिन्यात तालुकाध्यक्षकांची बैठक घेऊन बूथ यंत्रणा निश्चित करण्याचे आदेश दिले होते. परंतु काँग्रेसच्या काही नेत्यांनी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना वगळून मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात दौरे केल्यामुळे बूथ यंत्रणेचे काम थांबल्याचे सांगण्यात येते.

फेब्रुवारी महिन्यात सोलापूर मतदारसंघासाठी बैठका होतील. त्यावेळी उमेदवारा बाबत कल्पना दिली जाईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.