विटा, (vita)महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत कामकाजातील मूल्यांकनात विटा उपविभागाने पुन्हा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या हस्ते प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांचा सत्कार करण्यात आला.
महसूल विभागाच्या अंतर्गत कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अप्पर मुख्य सचिव खारगे यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीत आढावा बैठक झाली. त्यावेळी महसूल विभागाच्या विविध कामकाजाचे मूल्यांकन करण्यात आले. त्यात विटा उपविभागाने महसूल वसुली करणे, लक्ष्मी मुक्ती योजना राबविणे,फेरफार देण्यास लागणार वेळ कमी करणे,अपील प्रकरणे जलदगतीने निकाल काढणे, अशा अनेक गोष्टींत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे , उपजिल्हाधिकारी अजय पवार , मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप,राजीव शिंदे आणि विवेक काळे उपस्थित होते.
