राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढण्यावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय ?

नुकताच शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र निवडणुका लढतील, अशी चर्चा आहे आणि तसे संकेतही त्यावर शरद पवार यांनी मोठे भाष्य केले. फक्त हेच नाही तर अनेक वर्षांनंतर दोघा भावांचे मनोमिलन होताना अख्ख्या राज्याने बघितले. अनेक वर्षांनंतर राज ठाकरे यांच्या घरच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे संपूर्ण परिवारासह पोहोचले होते. दोघा भावांना एकाच मंचावर पाहून शिवसैनिकांचे मन भरून आले. शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. आता शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र निवडणूक लढण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले.

शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही. दोघांचीही मुंबईत ताकद आहे त्याचा आम्हाला फायदा होईल. आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुका मनसे आणि उबाठा गट एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे. दोघे भाऊ एकत्र येऊन आपआपल्या पक्षाची ताकद दाखवतील. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळे समीकरण बघायला मिळेल.

शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भातलही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, हैद्राबाद गॅजेट एक दिशा दाखवत आहे. मला याची कॉपी मिळाली आहे. सामंजस्य राहावं, एकीची वीण कायम रहावं हे सगळ्यांनाच वाटतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावे यासाठी प्रयत्न करावेत. कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे आणि हे घातक नक्कीच आहे. विखेंची समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत.