पेठ वडगाव, शिवाजी विद्यापीठ येथे होणाऱ्या शालेय विभागीय तलवारबाजी स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनची निवड झाली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (कोल्हापूर) यांच्यातर्फे के.एम.सी. कॉलेज येथे घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत ईपी, फाईल, सेबर अशा तलवारबाजीच्या विविध प्रकारात विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यामध्ये तन्मय सिद, श्रवण सूर्यवंशी, ओम कदम, आदित्यराजे माने, आदर्श पासलकर, शुभम रजपूत, सार्थक कावदार यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्याना संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने, संस्थेच्या सचिव सुवर्णा माने, बापूसो माने यांचे प्रोत्साहन व बाळासो पाटील, आनंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. मिलिटरी इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील, कॅप्टन सुरेश आडसूळ, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
