मागील दोन- तीन दिवसात सांगोला परिसरात झालेल्या पावसामुळे कोरडा, माण , अप्रुका नदीची पात्रातील पाण्यात वाढ झाली आहे. वाढेगांव येथील शेतकरी डॉ. धनंजय पवार यांच्या पटवडीला असलेल्या कोरडा नदीवरील बंधारा फुटल्याने सुमारे दहा गुंठे शेत उसासह वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
मागील तीन चार दिवसांपासून सांगोला तालुक्यातील काही गावात जोराचा पाऊस झाल्याने माण , कोरडा व आप्रुका या नद्यांच्या पात्रातील पाण्यामध्ये वाढ झाली आहे. कोरडा नदीवर डॉ. धनंजय पवार यांच्या शेताजवळ बंधारा असून त्याच्या कडा दुरुस्तीचे काम होणे गरजेचे होते. परंतु ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष असल्याने वाढलेल्या पाण्याने या नादुरुस्त भागातून पाणी प्रवाह सुरु झाला. परिणामी डॉ. पवार यांच्या ऊसाचे पीक असलेल्या रानात पाणी घुसून नुकसान झाले आहे.
