सांगोला पोलिसांनी मौजे कोळा ता. सांगोला येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून सुमारे ३५ हजार ४०० रुपये रोख रक्कम आणि सुमारे ११ लाख ६० हजार ४०० रुपये किंमतीच्या १२ दुचाकी व चारचाकी वाहने, जुगार साहित्य असा , एकूण ११ लाख ९५ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी संजय लक्ष्मण गडदे (रा. बाज ता. जत), सुनील रघुनाथ नरळे रा. पिंपळवाडी ता. कवठेमहंकाळ), महपती सिद्धा आलदर (रा. कोळा ता. सांगोला), अभिषेक अशोक सरगर, शशिकांत मारुती केदार, अभिजीत अशोक सावंत, प्रशांत दादू जाधव, दगडू नारायण गोडसे, नागार्जुन महेंद्र कांबळे रा. करगणी ता. आटपाडी जि. सांगली, उत्तम महादेव मदने, प्रकाश जगन्नाथ पवार रा. चितळी ता. खटाव जि. सातारा, धनाजी विठ्ठल गडदे, हेमंत अधिक पाटील, सचिन मधुकर कोरे (रा. कवठेमहंकाळ ), अंकुश आनंदा आलदर रा. कोळा ता. सांगोला अशा १५ जणांविरोधात फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई रविवार सायंकाळी मौजे कोळा (ता. सांगोला) गावाच्या शिवारात अंकुश आलदर याच्या शेडमध्ये तिराट जुगार खेळत असताना करण्यात आली.
