विटा(vita)सध्या सुरु असलेला सणांचा आणि उत्सवांचा काळ तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी तालुक्यातील रेकॉर्डवरील १० गुन्हेगारांना मोका लावला आहे.
मोस्ट वॉन्टेड नितीन जाधव यांच्यासह वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपीचा समावेश आहे. कार्वे येथील राहुल गणपती जाधव यांचा खून झाला होता. याप्रकरणी नितीन पांडुरंग जाधव, (परांगदा ), प्रफुल्ल विनोद कांबळे (वय २५,शंकर ऊर्फ दीपक पांडुरंग जाधव (वय ३७), रोहन रघुनाथ जाधव (वय २८), अमृतराज शहाजी माळी (वय ४६), संतोष मारुती हजारे (वय ३७,सर्व रा. कार्वे ),गजानन गोपीनाथ शिंदे (वय ४६,रा. मंगरूळ (चि ),नैन ऊर्फ नयन रंगलाल धामी (वय २७, रा. कार्वे , मूळ रा. मंगलशेड बस्ती,धनगडी , नेपाळ ),माणिक संभाजी परीट (वय ३८, रा. मंगरूळ (चि ),मूळ गाव ऐतवडे खुर्द,ता. वाळवा ), प्रतीक ऊर्फ बाबू श्रीकांत मोरे (वय ३३,मूळ राहणार माळभाग,बांबवडे ,ता. शिराळा )यांना अटक करण्यात आली होती.
