विट्याच्या जडणघडणीत योगदान असणाऱ्यांचे स्मरण करणे कर्तव्य ; आ. बाबर

विट्याच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे स्मरण करणे आपले परमकर्तव्य आहे; मात्र असे कार्यक्रम एखाद्या खोलीत घेण्यापेक्षा जाहीरपणे घेऊ,अशी ग्वाही आमदार सुहास बाबर यांनी दिली.

येथील विटा तालुका नागरवाचनालयातील सौ. काशीबाई देवाप्पा मुळीक सभागृहात विट्याच्या औद्योगिक क्रांतीचे जनक भाऊसाहेब भंडारे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर , बाबासाहेब मुळीक , गजानन दिवटे , प्रकाश अहुजा , मेघराज जोगड , डी. के. कदम, लक्ष्मण पाटील, सुरेश पाटील, चंद्रकांत पाटील, कॉम्रेड सुभाष पाटील, उत्तम चोथे , वैभव म्हेत्रे, अनिल बाबर,आनंदराव पाटील, बंडोपंत राजोपाध्ये , विनय भंडारे, विवेक भंडारे,सोहम भंडारे आदी प्रमुख उपस्थित होते.

कॉ . पाटील, श्वेता भंडारे आणि ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांनीही भाऊसाहेब भंडारे यांच्या आठवणींना उजाळा दिला. संयोजन संदीप मुळीक , विक्रम चोथे , भीमसेन कुरकुटे, यांनी केले, तर लक्ष्मणराव कोरे यांनी आभार मानले. यावेळी विक्रम लकडे, मुकुंद लकडे,वरद दिवटे, किसन डोंबे, प्रवीण बाबर, गुंडोपंत जोशी , स्नेहा देशपांडे उपस्थित होत्या.