अभिनेता सलमान खान याची वयाच्या 59 व्या वर्षी देखील चाहत्यामध्ये क्रेझ आहे. अभिनेता फक्त त्याच्या प्रोफेशल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. नुकताच, सलमान खान (Salman khan)आणि आमिर खान काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या ‘टू मच विथ काजोल-ट्विंकल’ या शोमध्ये विशेष पाहुणे म्हणून आले होते
सांगायचं झालं तर, काही महिन्यापूर्वी सलमान खान विनोदवीर कपिल शर्मा याच्या शोमध्ये आलेला. तेव्हा देखील त्याने स्वतःच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केलेला. सलमान खान याने ‘ट्राइजेमिनल न्यूराल्जिया’ नावाच्या आजाराबद्दल सांगितलं होतं. आता काजोल आणि ट्विंकल यांच्या शोमध्ये देखील सलमान खान यान आजाराबद्दल सांगितलं. एक काळ असा होता जेव्हा सलमान खान याला खाता देखील येत नव्हतं.
सलमान खान म्हणाला, ‘माझ्या कट्टर शत्रूला देखील अशा वेदना नको… जवळपास सात वर्ष मला चार – पाच मिनिटांनी तीव्र वेदना व्हायच्या. एक ऑंमलेट खाण्यासाठी मला एक तास लागायचा… तीव्र वेदनेमुळे मला अन्न चावता देखील येत नव्हतं. सुरुवातीला, ते दातांच्या समस्येसारखं वाटत होतं, म्हणून मी वेदनाशामक औषधे घेतली. नंतर मला कळलं की ते मज्जातंतूंचा त्रास आहे.’
सलमान खानने त्याच्या ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाच्या आजाराबद्दल पुढे सांगितलं, “साडेआठ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर, मला सांगण्यात आलं की वेदना 20-30 टक्क्यांनी कमी होतील. पण त्यानंतर कधी तीव्र वेदना झाल्या नाहीत. सलमान खान याने या आजारावर उपचार 2011 मध्ये केले.
रिपोर्टनुसार, सलमान खान केवळ या आजाराने ग्रस्त नाही तर त्याला ब्रेन एन्युरिझम आणि आर्टेरिओव्हेनस मॅलफॉर्मेशन (AVM) सारख्या न्यूरोलॉजिकल समस्या देखील आहेत. ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, ज्याला डौलोरेक्स असंही म्हणतात, या आजारामुळे दात घासताना आणि चेहऱ्याला स्पर्श करताना देखील वेदना होऊ शकतात.
