हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न झाले. यावेळी वाहनांमध्ये क्षमतेप्रमाणे ऊस भरावा, वाहतूक करताना मोबाईलबा वापर करू नये तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये वाहनांची आरटीओ कागदपत्रे, विमा व चालक परवाना वैध व बैलगाडी, अंगद ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांच्या पुढच्या बाजूस पांढऱ्या व मागील गोविंदराव हायस्कूलच्या बाजूस लाल रंगाची रिफ्लेक्टर ट्टी मागील बाजूस रिफ्लेक्टर पडदा लावून अपघात टाळावेत अशा सुचना देण्यात आल्या. यामुळे यावेळी हुपरी पोलीस मदत केंद्र उजळाईवाडी कोल्हापूर येथील अधिकारी उपस्थित होते.
वाहतुकीच्या नियमांचे पालन करून रस्त्यावरील ऊस वाहतूक करावी अपघात टाळावेत असे सपोनी किशोर शिंदे यांनी सांगितले. हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले व ट्रॉली पिन व टर्न टेबल इत्यादीची नियमीत काळजी घ्यावी तसेच चढत असेल पाठीमागे लावलेले दगड जाताना रस्त्याच्या कडेला टाकून जावे जेणेकरूनअपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन केले
स्वागत शेती अधिकारी किरण कांबळे आभार संचालक सूरज बेडगेयांनी मानले. संचालक आण्णासाहेब गोटखिंडे सपोनी सुनिल माळगे, गायकवाडसाहेब सुरक्षा अधिकारी संजय वासमकर, केनयार्ड सुपरवायझर सुदर्शन जंगले व वाहन मालक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.