आटपाडी,(Aatpadi) ‘शासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आम्ही मंत्रालयाच्या गेटवर मंगळवार दि. ३० पासून मंत्रालय , मुंबई येथे बेमुदत उपोषणास सुरवात करणार आहोत’,असा इशारा शेंडगेवाडीचे कैलास शेंडगे आणि ग्रामस्थांनी दिला आहे.
तहसीलदार शीतल बंडगर यांना निवेदन दिले. शेंडगेवाडीला ना पिण्याचे पाणी, ना रस्ते, ना वीज,ना जन्म -मृत्यू नोंदणीचे सोय आहे. रहिवासी दाखले न मिळाल्यामुळे शेकडो युवक-युवती शिक्षण व नोकरीस मुकले आहेत. शासकीय योजनांचे फायदे ग्रामस्थांना मिळू शकत नाहीत . याविरोधात ग्रामस्थ मंत्रालयाच्या गेटसमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
