एम.डी. पवार पीपल्स बँकेची वार्षिक सभा उत्साहात

एम.डी. पवार पीपल्स को- ऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. बँकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घोषित करण्यात आला. सर्व तरतुदी नंतर निव्वळ नफा ६९ लाख ३२ हजार रुपयांचा झाला आहे. चेअरमन श्रीमती अलकादेवी अशोकराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. आष्टा आणि शिराळा शाखा लवकरच सुरू करणार असल्याचे संचालक वैभव पवार यांनी सांगितले. येथील एम. डी. पवार मंगल कार्यालयातील सभेस बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, सर्व संचालक मंडळ व्यासपीठावर उपस्थित होते. बँकेच्या चेअरमन अलकादेवी पवार म्हणाल्या, बँकेकडे ६६ कोटींहून अधिक ठेवींचे  संकलन आहे. तर ४५ कोटींची कर्जे वाटप केली आहेत. नेट एनपीए शून्य टक्के आहे. लाईट बिल, नवीन पॅन कार्ड काढणे, जनरल इन्शुरन्सच्या सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेचे संचालक माजी नगरसेवक वैभव पवार यांनी अहवाल वाचन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष आवटी यांनी स्वागत व विषय वाचन केले. जनरल मॅनेजर महेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

 आयटी विभाग प्रमुख रोहित पाटील यांनी नव्या सुविधांची माहिती दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेत वेगवेगळ्या विषयांना सभासदांनी एक मताने मंजुरी दिली. माजी नगरसेवक अमित ओसवाल, अजित पाटील, विजय पवार, बँकेचे सभासद उपस्थित होते.