शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजचे चिणके येथे श्रमदान शिबिर

चिणके येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत एक दिवसाच्या श्रमदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचा मुख्य उद्देश गावामध्ये स्वच्छता, आरोग्याचे महत्व आणि शिक्षणाचे महत्व याविषूची जनजागृती करणे हा होता.

सदरचे श्रमदान शिबिर हे रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे उपाध्यक्ष महादेव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या शिबिराचे उद्‌घाटन सरपंच नाथा खंडागळे, उपसरपंच मोहन मिसाळ, प्राचार्य डॉ. रणजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी गावातील संपूर्ण परिसर स्वच्छ केला. त्यांनी गावातील

सार्वजनिक स्थळे, जिल्हा परिषद शाळा, व्यायामशाळा, माण नदीचा काठ आणि सोनारसिद्ध मंदिराच्या परिसराची स्वच्छता केली. श्रमदानासोबतच, विद्यार्थ्यांनी नागरिकांसाठी विशेष जनजागरण कार्यक्रम आणि समुपदेशन सत्रांचे आयोजन केले. या शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. पी. जी. पवार, सहसमन्वयक पी. बी. गायकवाड, प्रा. आर. यही. मिसाळ व राष्ट्रीय सेवा योजनेचे ६० स्वयंसेवक यांच्यासह विनायक मिसाळ, जालिंदर मिसाळ, महादेव माने, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचे श्रमदान शिबिर संस्थाध्यक्ष बाबूराव गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.