तिप्पेहाळी ता. सांगोला ग्रामपंचातीच्या रिक्त झालेल्या सरपंच पदावर दीपक साळुंखे पाटील गटाच्या नंदाबाई मारुती बजबळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून तिप्पेहाळी गावाचे सरपंचपद रिक्त होते. त्यामुळे सरपंच कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत नंदाबाई बजबळकर यांच्या एकवेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी गणेश टीके , सहायक म्हणून गाव कामगर तलाठी कोमल दौड आणि ग्रामसेवक विजय कांबळे यांनी काम पाहिले .
यावेळी दीपक साळुंखे पाटील गटाचे नेते शामराव बजबळकर , उपसरपंच बाबासाहेब नारळे यांच्यासह अनिता माने, दत्तात्रय नरळे , सुनील मोहिते,तानाजी नरळे , रंजना बजबळकर आदी सदस्यांसह श्रीमंत नरळे ,माजी सरपंच सोपान नरळे , तानाजी नरळे , सागर नरळे , संजय भुजबळकर , हरिदास बजबळकर , सावंत बजबळकर, गोरख बजबळकर , नामदेव नरळे ,अजय नरळे , हनुमंत नरळे आदी उपस्थित होते
