सांगोला, माहेरी आलेल्या विवाहित महिलेने पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी २. च्या सुमारास घडली.
निकिता गुंडाराम शिंदे(वय २५, रा. अजनाळे लिगाडेवाडी, ता. सांगोला) मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनमोल गवारे यांनी खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. निकिताचा सावळज येथील तरुणाशी विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून ती माहेरी राहत होती. दुपारी २ च्या सुमारास आई, शारदा व भाऊ अक्षय शिंदे घराबाहेर वैरण लावत होते. हीच संधी साधून निकिताने पत्राच्या खोलीतील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतला. ही घटना आई शारदा यांनी पाहून आरडाओरडा केली. तिला खाली उतरून तातडीने उपचार करता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.
