इचलकरंजी, किरकोळ कारणावरून एका युवकाचा मोबाईल फोन फोइन त्यास आठजणांनी बेदम मारहाण केली. शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका बारजवळ हा प्रकार घडला. यामध्ये अरमान रझाक नायकवडी (वय २३, रा. सावली सोसायटी, सध्या. रा. आयजीएमजवळ) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी आठ जणांवर शहापुर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी कि, अरमान नायकवडी हा शनिवारी घराजवळ राहिला होता. तेव्हा त्याचा मित्र अमोल हिरेमठ याने अजित भंडारेने तुला समाधान बारजवळ बोलविले असल्याचे सांगितले. तेव्हा अरमान नायकवडी हा तेथे गेला असता अजित भंडारे यांचेसह आठजणांनी त्याला तुला मस्ती आली आहे, असे म्हणत त्याचा मोबाईल घेऊन फोडला आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी अरमान नायकवडी याने दिलेल्या फिर्यादीनुसार अजित भंडारे, निलेश पारटे, विनायक शेवाळे, अमोल हिरेमठ, ओंकार सोनवणे, राकेश पाटील, संकेत माडंवकर (सर्व रा. सावली सोसायटी), अक्षय नरळे (रा. गणेशनगर, शहापुर) यांचे विरूध्द शहापूर पोलिसात रविवारी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकॉ. कोरे हे करीत आहेत.
