सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील धाराशिव साखर कारखाना संचलित सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ११ वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या हस्ते पार पडला. यावेळी होमहवन पूजा सौ. शितल व महादेव उत्तम देठे आणि सौ. दिपाली व राहुल कांतीलाल हादगिणे या दांपत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील बोलताना म्हणाले की, सांगोला साखर कारखाना सुरू करत असताना अनेक संकटे आली परंतू त्यातून मार्ग काढत गाळप यशस्वी केले. यंदा कारखान्याचे ४ लाख गाळपाचे उद्दिष्ट असून शेतकरी सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार अभिजीत पाटील यांनी केले. येत्या दिवाळी सणासाठी कामगारांना १५ दिवसाचा पगार बोनस म्हणून बक्षीस देणार असल्याचे आमदार पाटील यांनी जाहीर केले यावेळी प्रा. तुकाराम मस्के, बापूसाहेब देहूकर महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविक नितीन पवार यांनी केले कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी आभार मानले. सदर प्रसंगी सांगोला साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वनाथ चव्हाण, शहाजी नलवडे, तुकाराम जाधव, सदाशिव नवले यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
