हातकणंगले, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच हुपरी नगरपरिषद व हातकणंगले नगरपंचायतीची निवडणूक महाविकास आघाडी तसेच इतर समविचारी पक्ष व संघटनांना एकत्र करून ताकदीने लढविणार असल्याचे माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हातकणंगले तालुका कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व हुपरी नगरपरिषद, हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष हा एकसंघ आहे. पक्षाला स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची चलबिचल न करता पक्ष आणि पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून कामाला लागावे. आगामी हुपरी नगरपरिषद असो की हातकणंगले नगरपंचायत किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक त्यात काँगेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन ताकदीने उतरणार आहे. या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रतापराव काटकर, गणेश वाईंगडे, बाबासाहेब गायकवाड, अनिल महातूगडे, किरण पोतदार, अभिजीत कुंडले, बाळासाहेब जाधव, अनिल धोंगडे, किरण भोसले, बाळासाहेब शिंदे, रवींद्र कांबळे, शब्बीर कलावंत, शहेनशहा पोलाद, नितीन पाटील, प्रणित मधाळे, रानोजी ठोंबरे, मा. नगराध्यक्षा अर्चना जाणवेकर सचिन बोराडे, गिरीश इंगवले, नूर मोहम्मद मुजावर, बाळासाहेब वरुटे, दिपक वाडकर, डॉक्टर अभिजीत इंगवले, प्रकाश खांडेकर, योगेश पाटील, गोविंद दरक, संदिप देसाई, अनिल पाटील, सागर नलवडे राहुल चिनगे, मोहन चौगले, स्वप्नील नरुटे, जीवन कांबळे आदी उपस्थित होते.
