इस्लामपूर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा (ग्रामीण) च्या जिल्हा कार्यकारिणीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आम. शिवाजीराव गर्जे यांनी नुकतीच मंजुरी दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा (ग्रामीण) चे जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली. या जिल्हा कार्यकारिणी कार्याध्यक्षपदी माजी आ. विलासराव जगताप, माजी आ. राजेंद्र देशमुख यांची उपाध्यक्ष पदी धैर्यशील मोरे, दत्ताजीराव पाटील, राजेंद्र वाघ, हणमंतराव कदम यांची तर सरचिटणीसपदी नरेंद्र दिक्षीत, शशिकांत देठे, तम्मनगौडा रवी- तात्यासाहेब नलावडे यांची कोषाध्यक्षपदी रणजीत माने यांची, चिटणीसपदी राजेश लोखंडे, बळवंत मोरे, रंगराव संकपाळ, शरद पाटील, शिवाजीराव नांगरे, जितेंद्र शिंदे यांची, संघटक सचिवपदी त्र्यंबक तांदळे, मोहन पाटील, पांडुरंग पाटील, शशिकांत साळुंखे, राजेंद्र जाधव, प्रफुल्ल देशमुख यांची, सदस्यपदी दत्ताजीराव माने, प्रकाशराव पाटील, मोहन जाधव, सुरेश पवार, आदित्य देशमुख, शिवाजी सावंत, अशोक मोरे, शामराव पाटील, रावसाहेब पाटील, मुकेश जगताप, शिवाजी तोरणे, श्रीरंग कदम, भाऊसो गायकवाड, प्रमोद सावंत, नसीर मुल्ला, सहदेव कायापुरे, संभाजी पाटील, युवराज खामकर, प्रदिप शिंदे, हिम्मतखान येलूरकर, संतोष काळे आदींची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीची सांगली जिल्हा कार्यकारिणी जाहीर
