भारतातील क्रीडा प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताला 2030 मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद मिळालं आहे. भारताचे पररराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी एक्स अकाउंटवरून याबाबतची घोषणा केली आहे. यावेळी भारत दुसऱ्यांदा कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करणार आहे. यापूर्वी 2010 रोजी दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं.
पररराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, ‘भारत अहमदाबादमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार आहे, भारत आणि गुजरातसाठी हा अभिमानाचा क्षण असेल. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आणि क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनाची साक्ष आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्याने भारताला ऑलिंपिकचे आयोजन करण्याच्या प्रयत्नात मोठी मदत होईल. भारताचे पुढील प्रमुख ध्येय म्हणजे इतिहासात प्रथमच ऑलिंपिक खेळांचे आयोजन करणे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादच्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनाचं यजमानपद गुजरातला मिळाल्याने आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘गुजरात आणि भारतासाठी अभिमानाचा क्षण! राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाने 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी प्रस्तावित यजमान शहर म्हणून अहमदाबादची शिफारस केली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी अहमदाबादला भारताची क्रीडा राजधानी बनवण्याच्या आमच्या स्वप्नाला बळकटी देते. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या जागतिक क्रीडा उत्कृष्टतेसाठी अढळ वचनबद्धतेबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत’.
कॉमनवेल्थ गेम्स 2026 चं आयोजन स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणार आहेत. यामध्ये 74 देशांतील 3000 हून अधिक खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 2030 च्या कॉमनवेल्थ गेम्सच आयोजन अहमदाबादमध्ये होईल तेव्हा सुद्धा जगभरातून हजारो खेळाडू येथे येतील कॉमनवेल्थ गेम्स 2030 हे वर्ष कॉमनवेल्थ गेम्सच शताब्दी वर्ष असेल. पहिल्यांदा कॉमनवेल्थ गेम्सच आयोजन कॅनडामध्ये 1930 रोजी झालं होतं. त्यानंतर 2030 मध्ये हजारो खेळाडू अहमदाबादमध्ये जमतील. 2030 हे राष्ट्रकुल खेळांचे शताब्दी वर्ष असेल. हे खेळ पहिल्यांदा 1930 मध्ये कॅनडातील हॅमिल्टन येथे आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ब्रिटिश इंडियाने त्यात सहभाग घेतला नव्हता. भारताने ब्रिटिश इंडिया म्हणून प्रथम 1934 रोजी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभाग घेतला होता.
