शिक्षक, पदवीधर मतदार नोंदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद

इचलकरंजी,  १ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. शिक्षक मतदारांमध्ये २९७ तर पदवीधरमध्ये केवळ ३४ मतदारांनी नोंद केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पदवीधर व शिक्षकांनी आपल्या मतदानाची नोंद करावी, असे आवाहन सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी दिपक शिंदे यांनी पत्रकार बैठकीत केले.

 राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीचे काम सुरु झाले आहे. त्यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील नवीन मतदार यादी बनवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सदरचे काम १ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आले असून त्यामध्ये ऑनलाईन व ऑफलाईनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, गेल्या महिन्याभरात मतदारांनी अल्पसा प्रतिसाद दिला आहे. निवडणुकीच्यावेळी इचलकरंजी मतदारसंघात १ हजार २६ शिक्षकांची ५ हजार ९३८ पदवीधरांनी नोंदणी केली होती. त्यामुळे १० मतदान केंद्र उभारण्यात आले होते.