इचलकरंजीत मतदार संख्येत वाढ प्रारूप मतदार यादी प्रसिध्द; २ लाख ५० हजार ७३५ मतदारांची नोंद

इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी गुरुवारी अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा

  • २७ नोव्हेंबर अखेर हरकतीसाठी मुदत.
  • ४ डिसेंबर रोजी हरकतींवर छाननी होणार.
  • ८ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी जाहीर
  • १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर
    मानला जात असून यावर्षीच्या मतदार संख्येत मोठी वाढ झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
    शहरातील एकूण १६ प्रभागांमध्ये एकूण २ लाख ५० हजार ७३५ इतक्या मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये १,२६,६१४ इतके पुरुष तर १,२४,०६६ इतके महिला मतदार असून इतर (थर्ड जेंडर) ५५ मतदारांचा समावेश आहे.

त्याचबरोबर सर्वात कमी मतदार असलेला ४ क्रमांकाच्या प्रभागात १२ हजार १७१ तर सर्वाधिक २२ हजार ०९८ इतके मतदार प्रभाग १६ मध्ये आहेत.
प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी आणि आवश्यक दुरुस्तीसाठी सर्व वाद्या महानगरपालिका निवडणूक विभागात ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रभागानुसार अधिकारी नेमून ते महापालिका सभागृहात उपस्थित राहणार आहेत. मतदार यादीमध्ये कोणतीही हरकत अथवा सूचना असल्यास नागरिकांनी दिलेल्या मुदतीत संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार २७नोव्हेंबर अखेर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख असून ४ डिसेंबर रोजी हरकतींची छाननी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ८ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी तर १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, नवीन प्रभाग रचना आणि मतदारांची वाढलेली संख्या लक्षात घेता आगामी महानगरपालिका निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे.