इस्लामपुरातील अवैध धंदे बंद न केल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा…

आजकाल अनेक ठिकाणी अवैध धंदे चालू असलेली आपणाला पहायला मिळत आहेतच. असाच प्रकार इस्लामपुरात ही चालू आहे. इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या मटका व्यवसायासह अवैध धंदे बंद करावेत; अन्यथा जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा वाळवा तालुका संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा पोलिस प्रमुखांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.


संघर्ष समितीचे शाकीर तांबोळी, मकरंद करळे यांनी जिल्हा पोलिस प्रमुख बसवराज तेली यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मध्यमवर्गीय, कामगार वर्गाची आर्थिक लूटमार करणारा समाजविघातक मटक्याचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. तो आठ दिवसांत पूर्णपणे बंद करावा व मटका चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारावर मोका अंतर्गत कारवाई करावी; अन्यथा संघर्ष समितीकडून पोलिस प्रमुखांच्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करण्यात येईल.