वाळवा तालुक्यात पेठ हद्दीतील ‘हॉटेल मनिकंडण’च्या पाठीमागे बैलगाडा शर्यतीच्या मैदान परिसरात काल शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तब्बल आठ ते दहा फुटाचा अजगर जातीचा सर्प आढळून आला.वाळवा तालुक्यात हा सर्प आढळणारी पहिलीच घटना असून हा सर्प आठ ते दहा वर्षांचा असावा, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.वन विभागाने घटनास्थळी धाव घेत अजगराला ताब्यात घेतलं असून त्याची तपासणी करून त्याला अधिवासात सोडणार असल्याचं सांगितलं.
वन विभागाने दिलेली माहिती अशी, वाळवा येथील पश्चिमेला आशियाई महामार्गावरती मनिकंडण नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागे बैलगाड्यांच्या शर्यती घेतल्या जातात. याच मैदानाच्या एका पेरुच्या झाडावरती अजगर जातीचा सर्प रात्रीच्या वेळेस एका व्यक्तीला दिसून आला.
