जयंत पाटलांनी करुन दाखवलं! BJP महायुतीला धोबीपछाड, ईश्वरपूरमध्ये एकहाती सत्ता

सांगलीच्या ईश्वरपुर नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी एकाहाती सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे हे देखील विजय झाले आहेत.

30 जागापैकी या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाला तब्बल 23 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपा महायुतीला सात जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या विजयानंतर ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालांची उधळण करत जल्लोष करण्यात येत आहे.

ईश्वरपूर नगर परिषदेसाठी महायुती विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार आघाडी अशी लढत होती. जयंत पाटलांच्या विरोधात या ठिकाणी सर्व विरोधक एकवटले होते. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आनंदराव मलगुंडे आहेत तर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र विश्वनाथ डांगे हे भाजपाचे उमेदवार होते.

सांगली जिल्हा 6 नगर परिषद / 2 नगरपंचायत

1 ) ईश्वरपूर नगरपरिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आनंदराव मलगुंडे विजय

2 ) आष्टा नगरपरिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विशाल शिंदे विजयी

3 ) तासगाव नगरपरिषद स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया सावंत विजयी

4 ) पलूस नगरपरिषद काँग्रेसच्या संजीवनी पूदाले विजयी

5 ) विटा नगरपरिषद शिवसेना शिंदे गटाचे काजल म्हेत्रे विजयी

6 ) जत नगरपरिषद भाजपाचे रवींद्र आरळी विजयी.

7) आटपाडी नगरपंचायत भाजपाचे उत्तम जाधव विजयी

8 ) शिराळा नगरपंचायत शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीसिंग नाईक विजयी.

जिल्हा – सांगली – नगराध्यक्ष –
एकूण जागा – 8

भाजप – 2 ( जत / आटपाडी विजयी)
शिवसेना – 2 – ( विटा /शिराळा )
राष्ट्रवादी –

काँग्रेस – 1 पलूस
ठाकरे गट –
शरद पवार गट – 2 ( ईश्वरपूर /आष्टा )
स्थानिक विकास आघाडी – 1 ( तासगाव