महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ

देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. दररोज यात भर पडत आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी माहिती दिली की, भारतात कोविडचे 605 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 4,002 वर पोहोचली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत संसर्गामुळे चार लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये केरळमधील दोन, कर्नाटक आणि त्रिपुरामधील एकाचा रुग्णाचा समावेश आहे.

कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चिंता वाढल्य़ा आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात १३९ रुग्ण आढळले आहेत

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारीपासून जेएन.1 उप-प्रकारचे एकूण 682 नवीन रुग्ण आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकात 199, केरळमध्ये 148, महाराष्ट्रात 139, गोव्यात 47, गुजरातमध्ये 36, आंध्र प्रदेशात 30, राजस्थानमध्ये 30, तामिळनाडूत 26, दिल्लीत 21, ओडिशात तीन, तेलंगणात एक आणि हरियाणात एक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात JN.1 चा व्हेरिएंट आढळला आहे. असं असलं तरी लोकं लोक होम क्वारंटाईनमध्ये बरे होत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांना श्वसनाच्या गंभीर आजाराच्या जिल्हावार प्रकरणांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. जेणेकरून वाढत्या प्रकरणांचा कल लवकर ओळखता येईल.