प्रवाशांच्या सुविधेसाठी, तसेच एस्.टी. गाड्यांची माहिती देण्यासाठी एस्.टी.च्या प्रत्येक आगारात चौकशी कक्षाचा अधिकृत संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे क्रमांक दर्शवण्यात आले आहेत. प्रत्यक्ष संपर्क केला असता सांगली जिल्ह्यातील विविध एस्.टी. आगारांतील घोषित करण्यात आलेले बहुतांश अधिकृत संपर्क क्रमांक बंद अथवा अकार्यक्षम रहातात.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हे सर्व क्रमांक तात्काळ चालू करण्यात यावेत, तसेच नियमित पडताळणी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने जिल्ह्यातील मिरज, विटा, ईश्वरपूर आणि पलूस येथील आगार व्यवस्थापकांना देण्यात आले. ‘या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू’, असे सर्व आगार व्यवस्थापकांनी आश्वासन दिले.
सांगली येथे विभागीय नियंत्रक श्री. सुनील भोकरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी ‘सुराज्य अभियाना’चे सांगली जिल्हा समन्वयक श्री. राहुल कदम, तसेच सर्वश्री नारायण चौगुले, राज शिंदे, महेश शेट्टी, विठ्ठल मुगळखोड, भीमराव खोत, विकास कुलकर्णी, भरत जैन, पलूस येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री सचिन जाधव, गणेश बुचडे, विटा येथील सिंह सेनेचे संस्थापक श्री. शिवभैय्या शिंदे, ईश्वरपूर येथील भारतीय किसान संघटनेचे श्री. अजित जाधव (अण्णा), श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शेखर खांडेकर, हिंदु धर्मप्रेमी श्री. अभिमन्यू पाटील, युवा उद्योजक श्री. रत्नाकर पवार, पाटीदार समाजाचे श्री. किरीट पटेल, सनातन संस्थेचे श्री. सुरेश जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
