लाडक्या बहिणी अधिक लाडक्या! सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. ई-केवायसी पडताळणीनंतर या लाडक्या बहिणींची संख्या देखील कमी झाली आहे. दरम्यान, सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला आहे.लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण, लाडकी बहिण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 98 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98 कोटी 55 लाख रुपयांचा निधी वितरीत झाला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 960 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीने लाडक्या बहिणींसाठी हा हफ्ता वितरीत करण्यात आला आहे.

लाडकी बहिण योजनेचा गेल्या वर्षी राज्यात 2.4 कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला होता. त्यानंतर ई-केवायसी पडताळणी केल्यानंतर ही संख्या कमी झाली आहे.

ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ डिसेंबर २०२५ पासून थांबवण्यात आला होता. आता हा ई-केवायसी पडताळणी झाल्यानंतर पात्र महिलांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात हा हफ्ता मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.