फेरनिवडीनंतर विट्यात जल्लोष….

ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. बाबासाहेब देवाप्पा मुळीक यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवडीचे पत्र देवराज पाटील यांना देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राजारामनगर येथे आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते देवराज पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. त्यानंतर विटा येथील खानापूर रस्त्यावरील श्रेयस भवनसमोर फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून अॅड. मुळीक यांना निवडीचे पत्र दिले.