खानापूर विधानसभेची जागा काँगेस लढविणार: अॅड. विठ्ठलराव साळुंखे

खानापूर आटपाडी विधानसभेची जागा ही परंपरेनेकाँग्रेस पक्षाची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसअॅड. विठ्ठलराव साळुंखे ताकदीने लढणार आहे.

खानापूर मतदारसंघाच्या निर्मितीपासून दोन अपवाद सोडले तर येथील जनतेने काँग्रेस पक्षास साथ दिली आहे. काँग्रेसचा तरुण तडफदार चेहरा तयार असून योग्यवेळी जाहीर होईल. काहीही झाले तरी काँग्रेस यंदाची विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे, अशीघोषणा युवा नेते शिवप्रताप पतसंस्थेचे कार्यकारी संचालक अॅड. विठ्ठलराव साळुंखे यांनी केली.

अॅड. साळुंखे म्हणाले, खानापूर – आटपाडी विधानसभेची जागा ही परंपरेने कॉंग्रेस पक्षाची आहे काँग्रेस ताकदीने लढणार आहे. आतापर्यंतचे सर्व आमदार काँग्रेसच्या मुशीतून तयार झाले आहेत. डॉ. पतंगराव कदम यांचे तालुक्यावर प्रचंड उपकार आहेत. लवकरच काँग्रेस कार्यकारिणी जाहीर होईल जी जनतेतून निवडली जाईल.