सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 1 जुलैला……

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) पुन्हा एकदा वाढणार आहे. केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवते. पहिला 1 जानेवारीपासून लागू करण्यात आला आहे, तर दुसरा 1 जुलैपासून लागू होणार आहे.या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% एवढा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहे. आता सरकार महागाई भत्त्यात किती वाढ करणार हे पाहणे महत्वाचे आहे.वाढत्या महागाईचा विचार करता सरकार चार ते पाच टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता आहे.

सरकारने डीएमध्ये 5 टक्के वाढ केल्यास 1 जुलैला कर्मचाऱ्यांचा डीए 55 टक्के होईल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या 50 टक्के महागाई भत्ता (DA) मिळत आहे. तो जानेवारी 2024 पासून लागू आहे. महागाई भत्त्यात वाढ जुलै 2024 पासून लागू होणार आहे.

मात्र, तो मंजूर होईपर्यंत ऑगस्ट उलटण्याची शक्यता आहे. मागील वर्षांचे रेकॉर्ड पाहिलं तर सरकार सप्टेंबरपर्यंत डीए वाढवण्याची घोषणा करू शकते. मात्र, जुलैपासूनच त्याची अंमलबजावणी होणार आहे.