सांगोला विद्यामंदिर प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने स्वागत

इ.१० वीच्या बोर्ड परीक्षेची सुरुवात दि.२० फेब्रुवारी रोजी झाली. सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथील केंद्रावर संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या शुभहस्ते परीक्षेसाठी प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्पाने करण्यात आले.

यावेळी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या हस्ते गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार समर्पित करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, काकासाहेब नरुटे व उत्तम सरगर, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या परीक्षेमध्ये एकूण ६७५ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. यामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला, इंग्लिश स्कूल, उत्कर्ष विद्यालय, देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय मेडशिंगी, माध्यमिक विद्यालय शिवणे व विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.