राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे गेल्या महिन्यात विमान अपघातात निधन झालं. 28 जानेवारीला बारामतीजवळ त्याचं विमान क्रॅश झालं आणि त्यात अजित दादांसह 5 जणांना जीव गमवावा लागला. त्यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र हळहळला, बारामतीत तर प्रत्येकाच्या डोळ्यांतील अश्रूंना खळ नव्हता. दरम्यान अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली असून त्याच्या पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगातर्फे सुरू करण्यात आली आहे. याचसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणूक लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैछकीमध्ये ही पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झालं आहे. बारामती विधानसभेची पारुप मतदारयादी 10 मार्चला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असेल.
सुनेत्रा पवारांकडे बारामतीची धुरा
विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर बारामती विधासभेची पोटनिवडणूक होणार आहे. या निवडमुकीमध्ये आता राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार याच उमेदवार असणार आहेत. यासंदर्भातील चर्चा राष्ट्रवादील काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही झाली. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता बारामतीची धुरा ही सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर असणार आहे.विधासभेची पोटनिवडणूक त्या लढताना दिसतील.
