पाल पडलेलं दूध पिल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील बेळगावी येथील एका शाळेतील हा प्रकार उघडकीस आला आहे. शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा झाल्याच्या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
दुधातून विषबाषा झाल्यामुळे 23 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिक्षण विभागाकडून या प्रकरणी अधिक तपास आणि चौकशी सुरु आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बेळगावी येथील सरकारी प्राथमिक शाळेत गुरुवारी, 11 जानेवारीला सकाळी मृत पाल असलेलं दूध प्यायल्याने सुमारे 23 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी शिक्षण विभागाने तपास सुरू केला आहे.