मराठा आरक्षण हा मुद्दा सगळीकडेच जोर देत आहे. मनोज जरांगे यांनी 24 जानेवारीला मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलेला आहे आणि या आंदोलनात अनेक मराठा बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर विटा येथे मराठा बांधवांच्या बैठकी घेण्यात येत आहेत. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातून जोरदार तयारी होत आहे.
मुंबई येथील आंदोलनासाठी विट्यात मराठा बांधवांकडून बैठक घेऊन रणनीती सुरू झाली आहे. ॲड. सदाशिव भाऊ पाटील आणि सुहास भैया बाबर, सुहास नाना शिंदे यांच्यासह मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.
विट्यात 21 जानेवारी रोजी भव्य बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आलेले आहे. 24 जानेवारीला मुंबई येथील मराठा आंदोलनाला विट्यातून जाण्याची घोषणा देखील या बैठकीमध्ये करण्यात आली. मराठा बांधवांच्या वतीने शंकर नाना मोहिते यांनी याची माहिती दिली आहे.