सोलापूर जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या कायम दुष्काळी असलेल्या मंगळवेढ्यातील 19 गावांत शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आजून उन्हाळा सुरूही झाला नसताना फळबागायतदार शेतकऱ्यांना बहारात असलेल्या द्राक्ष,डाळींब व आंब्यांच्या फळबागांना टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.हिवाळ्यात ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्यात खुप भयानक परिस्थिती उदभवेल असे शेतकऱ्यांचे मत आहे.