IND-PAK सामन्यासाठी खास सोय! चेक करा टाईमटेबल

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. तर दुसऱ्या सामन्यात भारताचा संघ अफगाणिस्तानविरूद्ध दोन हात करणार आहे.

दरम्यान क्रिकेट चाहते १४ ऑक्टोबर रोजी भारत- पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहताय. या सामन्यासाठी पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

भारत आणि पाकिस्तान सामना हा १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी पश्चिम रेल्वे मंबुई ते अहमदाबाद दरम्यान २ स्पेशल ट्रेन चालवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ही ट्रेन १३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता मुंबईतून निघेल. ही ट्रेन सकाळी ६ पर्यंत अहमदाबादमध्ये दाखल होईल. तसेच सामन्याच्या दिवशी वंदे भारत एक्स्प्रेस अहमदाबादच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्स वेळेत सामना पाहण्यासाठी पोहचू शकतील.

ही ट्रेन कुठे कुठे थांबणार याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच पश्चिम रेल्वेकडून या स्पेशल ट्रेन्सचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं जाऊ शकतं. मिळालेल्या माहितीनूसार ही ट्रेन सूरत, वडोदरा, आनंद आणि भरूच येथे थांबू शकते.

नियमित वंदे भारत एक्स्प्रेस बुधवार वगळता इतर सर्व दिवस सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी मुंबई सेंट्रल स्थानकावरून सुटते. तर जन शताब्दी एक्स्प्रेस रविवारी वगळता इतर सर्व दिवस सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटते.