75 व्या प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली कर्तव्य पथावर संचलन करण्यात आले. यावेळी शिवराज्याभिषेकच्या 350 व्या वर्षानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथाकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. या रथावर किल्ला उभारण्यात येऊन त्याच्या समोर बाल शिवाजींना माता जिजाऊ पुस्तकातील गोष्टी सांगत त्यांच्यावर संस्कार करीत असल्याचे दृश्य साकारण्यात आले होते. तर रथाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज राजदरबारात सिंहासनावर आरुढ झाल्याचे दिसत होते. आणि त्यांच्या समोर संभाजी महाराज उभे असून दरबारातील इतर मंत्री आणि दादोजी कोंडदेव दिसत होते. यावेळी महाराष्ट्रातील पारंपारिक वेशभूषेत रणरागिणी महिला दांडपट्टा चालविताना दिसत होत्या. या चित्ररथाने उपस्थितांचे लक्ष वेधले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या रथाकडे कौतूकाने पाहाताना दिसत होत्या.
कर्तव्यपथावर घुमला शिवरायांचा जयजयकार
