प्रत्येक गावांमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात. जेणेकरून त्या गावातील प्रत्येक नागरिकांचा विकास व्हावा त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू नये.तर असाच एक ऐतिहासिक निर्णय कार्वे ग्रामपंचायतने नुकताच घेतलेला आहे.कार्वे ग्रामपंचायतीने अखंड तालुक्यात एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.
अंत्यविधीसाठी लागणारे सर्व साहित्य मोफत देण्याचा निर्णय कार्वे ग्रामपंचायतिच्या वतीने घेण्यात आलेला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सरपंच बाळासो जाधव यांनी ही घोषणा केलेली आहे.आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक निर्णय घेतल्याचे सरपंच बाळासो जाधव यांनी सांगितले.