इचलकरंजीत अष्टविनायक कॉलनीत राहणाऱ्या कमलेश तलसरे हे एक कापड व्यापारी आहेत. त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर ते राजस्थानमध्ये गेले होते. जाताना त्यांनी आपल्या घराची किल्ली शेजारच्या नटवरलाल चांडक यांच्याकडे ठेवली होती. चांडक यांनी ती किल्ली आपल्या दरवाजाला अडकवली होती.
तलसेरा हे घरी परतल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याच दिसून आलं. घरातील सोन्याच्या दोन चैन, कानातील रिंगा, अंगठी, रोख रक्कम 12300 रुपये आणि दुचाकीची किल्ली गायब झाली होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्याच कॉलनीत राहणाऱ्या जया हुडकत या महिलेने ही चोरी केल्याचे स्पष्ट झाल. त्यामुळे तलसेरा यांच्या फिर्यादीनुसार त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल झालाय.