इचलकरंजीत रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या कबड्डी स्पर्धेत गंगामाईचे घवघवीत यश

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये अनेकजण मोठ्या उत्साहाने सहभाग देखील नोंदवतात. नुकतीच रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांनी इंटरॅक्ट क्लब मार्फत प्रायोजित केलेल्या इयत्ता ७ वी ते ९ वी मधील मुला व मुलींच्या शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच जयहिंद मंडळ येथे पार पडल्या.

या स्पर्धेमध्ये मुलींच्या गटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या क संघाने द्वितीय क्रमांक पटकावला, तर ब संघाने तृतीय क्रमांक पटकावला. संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे संघ अ-श्रावणी भोसले दिव्या कवडे, अपेक्षा जेडर, दीप्ती जगताप, आर्या नाईक, पायल देशमुख, सावली शेलार, वेदिका कांबळे, सृजना पाटील, रिफत मुजावर, शर्वरी भांगे, नारायण पानारी संघ ब – श्रावणी पाटील, श्रावणी आमणे, ऋतुजा दुधनी, लक्ष्मी सोनुले, मंतशा भालदार, मुन्सिफा भालदार, समीक्षा नेमिष्टे, वैष्णवी माळी, श्वेता कांबळे, सृष्टी माळी, ज्योती रावळ, दिया डांगे.

दोन्ही संघांना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शेखर शहा यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर, उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे, उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक श्री व्ही. एन. कांबळे, पर्यवेक्षक एस. व्ही. पाटील यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले…