पंतप्रधान पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर..

पंतप्रधान नरेंद्र मोदी   हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. नाशिक, मुंबई आणि सोलापूरच्या दौऱ्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहे. यावेळी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. पुण्यात रुबी हॉल ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या दौऱ्यावर असताना या विकासकामाचं उद्घाटन करणार आहेत. रूबी हॉल ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सुमारे 5.5 किलोमीटरच्या तिसऱ्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार असून यात बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी स्थानकाचा समावेश असणार आहे.