हुपरीत गुंतवणूकदारांचा ठकसेनच्या दारात ठिय्या….

हुपरी येथील फसवणूक प्रकरणी गुंतवणूकदारांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाला ठकसेनने महत्व दिले नाही तर आंदोलकांना ठकसेनच्या कुटुंबातील लोक हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतील . दरम्यान हुपरी पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून कुटुंबांतील लोकांना चर्चेचा मार्ग मोकळा आहे. वाद टाळा असा दम भरला आहे. मात्र ठकसेनच्या दारात गुंतवणूकदारांचा सलग चौथ्या दिवशी ठिय्या सुरू असून ठकसेन गायब असल्याचे चित्र दिसत आहे. वैफल्यग्रस्त झालेल्या आंदोलकांनी परतफेड न झाल्यास ठकसेनच्या दारातून परत जाणार नाही असा पवित्रा घेतला आहे हिंमत असेल तर त्याला शोधून दाखवा असे आव्हान कुटुंबातील सदस्य करीत असल्याने गुंतवणूकदार गडबडून गेले आहेत.

एकदिवस आंदोलक सामुदायिक टोकाची भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, हुपरी पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचे प्रमुख एकनाथ भांगरे यांनी आंदोलन शांततेच्या मार्गाने करीत असल्याची लेखी कबूली घेतली आहे. आता पुढे काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.