यापूर्वीही मला 54 आमदार सोडून गेले, नंतर ते निवडणुकीत पडले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी फारशी चिंता करण्याची गरज नाही, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार निश्चित येणार, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गटाचे ) सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
प्रारंभी जिल्ह्यातील इचलकरंजी, चंदगड, कागल, कोल्हापूर उत्तर व भुदरगड तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना कोणत्या मतदारसंघातून जादा मताधिक्य दिले याचा लेखजोखा मांडला.
इचलकरंजी मतदारसंघात हाळवणकर व आवाडे गटातील वादाचा फायदा आपल्याला मिळू शकतो. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार एकजूट आहेत. त्यामुळे विजय निश्चित असल्याचे सांगितले.