पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बायोगॅस घेवून जाणाऱ्या ट्रकमधील अचानक गॅस गळती सुरु झाली.यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली. गॅस हवेत पसरून दुर्गंधी पसरली तर स्फोट होईल या भितीने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
गॅसच्या दुर्गंधीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज काही काळ थांबविण्यात आले.गॅस दुर्गंधीमुळे डॉक्टरांचे कामकाज काही काळासाठी थांबवण्यात आले. कारण गॅसची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात परिसरात पसरली होती.
काही रूग्ण उपचारापूर्वीच घरी निघून गेले. घटनास्थळी गॅस गळती रोखण्यासाठी कंपनीचे व स्थानिकांनी नागरिकांनी धाव घेवून गॅस गळती रोखली. गॅस गळतीमुळे महामार्गवरील वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती.