कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले (hatkanangale) तालुक्यातील हेरले येथील धीरज दीपक लोखंडे या मागासवर्गीय तरुणाला दिवसाढवळ्या घरातून उचलून गावगुंडांनी जबर मारहाण करत गंभीर जखमी केल्याचा आराेप डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने केला आहे.
या मारहाणीमुळे लोखंडे हा सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. हातकणंगले पोलिसांनी संबंधित गुंडांवर जुजबी कारवाई करत संशयितांना पाठीशी घातल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने केला आहे.
दरम्यान हातकणंगले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्त्यावरून जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. या माेर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.