अवघ्या एक हजार रुपयांत भाजप घडविणार 5 हजार नागरिकांना अयोध्या दर्शन

अयोध्या राम मंदिराचा सर्वांनाच ध्यास लागला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) जिल्ह्यातील पाच हजार जणांना अवघ्या एक हजार रुपयांमध्ये अयोध्या दर्शन घडवण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. १३) रात्री ९.३० वाजता अयोध्येला जाणारी ही विशेष रेल्वे कोल्हापुरातून जाणार आहे. अयोध्येला जाण्यासाठी भाजप कार्यालय, जिल्हाध्यक्ष यांच्याकडे नोंदणी करावी,’ असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

खासदार महाडिक म्हणाले, ‘भारतीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे मंदिर (Ayodhya Ram Temple) पाचशे वर्षांनंतर साकार होत आहे. त्यामुळे प्रत्येकालाच रामाच्या दर्शनाची ओढ आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षातर्फे जिल्ह्यातील पाच हजार नागरिकांना अयोध्या दर्शन घडवून आणण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी (ता. १३) विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे.