व्यवहार बंद ठेवून आचार्यश्री विद्यासागरजीना विनयाजंली,

कोल्हापूर,सांगली, बेळगांव जिल्हात शोककळारूकडी माणगाव – साहित्यिक, राष्ट्रभक्त, समाजसुधारक, सर्वात प्रभावशाली संत आचार्य श्री विद्यासागरजी मुनिमहाराज यांचे डोंगरगड (छत्तीसगड,)येथे दि १७ रोजी रात्रौ २.३० वाजता सल्लेखनापूर्वक समाधी झाले त्यांचे देश‌,परदेश‌मध्ये कोट्यावधी भक्तगण आहेत.

माणगाव येथील जैन समाजातील श्रावक व श्राविकानी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून आचार्यश्रीना विनयाजंली व्यक्त केले. आचार्यश्रीचे समाधीचे वार्ता कोल्हापूर, सांगली, बेळगांव जिल्हात समजताच जैन समाजात दुःख कळा पसरले आहे.आचार्य श्री विद्यासागरजी यांचा जन्म १०ऑक्टोबर १९४६ रोजी सदलगा कर्नाटक येथे असून झाला असून सन १९६८ साली आचार्य श्री ज्ञानसागरजी महाराज यांच्या कडून अजमेर राजस्थान येथे दिक्षा घेतले होते.