19 फेब्रुवारी रोजी शिवगंगा मंदिर परिसरातील साळुंके गल्लीतील शिवमुर्ती कला क्रीडा व सांस्कृतिक समाजसेवी मंडळ प्रतिष्ठानकडून महिलांच्या उपस्थितीत पाळणा सोहळा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पालखी सोहळा मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे.
कोल्हापुरातून सहा फूट उंचीची शिवरायांची मूर्ती तयार करून आणलेली आहे. 13 फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. 13 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.