नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की राडा, गोंधळ या गोष्टी आल्याच. नुकतचं उदगीर (Udgir) येथे गौतमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी पाहायला मिळाली. नेत्यांचे बॅनर फाडत तरुण टॉवरवर चढले होते. दरम्यान एका तरुणाच्या डोक्यात दगड लागला. गौतमीच्या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार सुधाकर भालेराव आणि भाजपा जिल्हाध्यक्षांनी हजेरी लावली होती.
उदगीर येथील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात बेधुंद तरुणांनी तुफान राडा केला. मागे बसलेल्या प्रेक्षकाना कार्यक्रम दिसत नसल्यामुळे मागून मारलेल्या दगडात एक तरुण जबर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. औषध उपचारानंतर तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
उदगीर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) तसेच उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) आणि भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) यांच्या अनेक राजकारणी लोकांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. कार्यक्रम स्थळी नेत्यांची मोठी बॅनर लावण्यात आली होती.
गौतमीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तरुणांनी गर्दी केली. कार्यक्रम व्यवस्थित पाहता यावा यासाठी तरुणांनी नेत्यांची बॅनर फाडून टॉवरवर उभं टाकणं पसंत केलं. यासाठी नेत्यांचे बॅनर फाडत तरुण टॉवरवर चढले होते. आयोजकांनी अनेक वेळेस तरुणांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व व्यर्थ होत होतं.